home aboutus contactus
       
 
 
 
 
       
 
President’s Message
Principal's Desk
Management Body
Right to Information Act
News & Events
IQAC
Research


DEPARTMENT OF MARATHI

 

प्रस्तावणा

ज्ञानोपासक महाविद्यालय परभणच्या मराठी विभागाची स्थापना महाविद्यालया सोबत 1984 पासून झाली आहे. महाविद्यालयाचा पद्युत्तर विभाग 1995-96 साली सुरु झाला आता पर्यंत या विभागातून शिकून गेलेल्या अनेकांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्वाची कामे केलेले आहेत. मराठी विभागाच्या सहाय्याने महाविद्यालयाने सुरुवातीच्या काळात ज्ञानोपासक प्रकाशनही चालवले. विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वाड्:मयीन उत्कर्षासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्यात चर्चा, परिसंवाद कविसंमेलने, वाड्:मयमंडळाचे उद्घाटने स्वागत व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात येते. विभागाच्या वतीने 1997 साली बी. रघुनाथ यांच्या समर्ग वाड्:मयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यत के. ज. पुरोहित, म.दा. हातकणगलेकर, विजया राजाध्यक्ष, चंद्रकांत पाटील, वसंत आबाजी डहाळे, प्रभा गणोलकर, प्रकाश कामतीकर, प्रकाश मेदककर इ. मान्यवर सहभागी झालेले होते. पुढे या चर्चासत्रातील निबंधाचे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. त्या पुस्तकाचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आलेला होता.

वाड्:मयमंडळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आतापर्यंत भास्कर चंदनशीव, रेणू पाचपोर, आनंद यादव, केशव घटींग, आनंद देशपांडे, इ. माऩ्यवरांची उपस्थीती राहिलेली आहे.

एकेकाळी मराठी विभागाचे प्रमुख असलेले प्रा. ना.मा. बुलंगे हे प्रसिध्द रंगकर्मी होते दुरदर्शन मालिका नाटके व एकपात्री प्रयोगाचे ते गाजलेले कलावंत होते. त्या नंतरचे विभाग प्रमुख प्रा. केशव बा. सेकर हे नामवंत कवी, ललित लेखक आणि समीक्षक होते. त्यांची 15  पुस्तके प्रकाशित झाल ली आहेत. सध्याचे विभाग प्रमुख प्रा. इंद्रजित भालेराव हे ही लोकप्रिय कवी असून त्यांची 25 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये वाड्:मयीन व सामाजिक जाणिवा निर्माण करण्याचे काम नेहमीच विभागने केलेले आहे. संस्थेच्या ध्येयधोरणात सहभागी राहून नेहमीच सामाजिक उत्कर्षात सहभाग घेतलेला आहे.

© Copyright 2007-10 Dnyanopask College, Site Best Viewed in 1024 x 768  Powered By Shantanu Computer Systems